Maratha Protest HC : मोठी बातमी! न्यायालयाने स्वीकारली मराठा आंदोलनाविरोधातील याचिका, आता पुढे काय?

Maratha Protest HC : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा जोरदार पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत चक्काजाम आंदोलन करणार आहेत. अशातच आता मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी आहे.

मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करणारी याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारली असून आज दुपारी अडीच वाजता या याचिकेवर तातडीची सुनावणी पार पडणार आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं, अन्यथा येत्या २६ जानेवारीला मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

लाखो मराठा आंदोलकांसह जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कूच सुरू केली आहे. अशातच जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. Maratha Protest HC
मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी याचिका सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली होती. ही याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारली असून या याचिकेवर आज दुपारीच मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाचं काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.