मराठा क्रांती मोर्चानं दंड थोपाटलं ; थेट मुंबई पोलिसांना पत्र पाठवत केली मोठी मागणी…

मुबंई : मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनासाठी त्यांना एकच दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता मराठा क्रांती मोर्चानं दंड थोपाटत थेट मुंबई पोलिसांना पत्र पाठवल आहे. आंदोलनाला मुदतवाढ देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात झाल्याची घोषणाही केली आहे. या आंदोलनाला मुदतवाढ देण्याची मागणी जरांगेंनी सरकारकडे केली आहे. या संदर्भातील पत्र देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे.27 तारखेपासून जालन्यातील अंतरलवाली सराट्यातून निघालेला भव्य मोर्चा आज सकाळी 10 वाजता मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. दरम्यान, उपोषणस्थळी दाखल होताच मनोज जरांगेंनी शिवरायांना अभिवादन करून उपोषणाला सुरुवात केली आहे. सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी यावेळी दिला. मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हटायचं नाही हलायचं नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही असंही जरांगे म्हणालेत. सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणासाठी उद्याची वेळ वाढवून देण्यासाठी मराठी क्रांती मोर्चाने विनंती केली आहे.
त्यांनी डिसीपी झोन १ प्रवीण मुंढे यांना दिलं पत्र आहे. मनोज रंगना या आंदोलनासाठी अटी शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे.

काय आहेत आंदोलनाला पोलिसांच्या अटी शर्ती?
1.पोलिसांची एकच दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनाला परवानगी
2.वेळ संपल्यानंतर मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नाही
3आझाद मैदानात 7 हजार स्क्वेअर मीटरचे क्षेत्र आंदोलनासाठी राखीवमैदानाच्या क्षमतेनुसार केवळ 5000 आंदोलकांना मुंबई पोलिसांची परवानगी
4.आझाद मैदानात अन्न शिजवण्यास मनाई
आझाद मैदानावर किती पोलीस कर्मचारी तैनात?
आझाद मैदानावर 1500च्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात आहेत.आवश्यकता भासल्यास अतिरिक्त पोलीस फोर्स मागवणार
आंदोलनस्थळी 200 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी तैनात
5 डीसीपी आणि त्यापेक्षा पुढील दर्जाचे अधिकारी तैनात
दंगल नियंत्रण पथक आणि अग्निशमन दलाची पथकं तैनात
दरम्यान, मराठा आंदोलकांना जरांगेंनी शांततेचं आवाहन केलं. जरांगेंच्या सोबत हजारोंच्या संख्येने मराठ्यांचं वादळही समर्थनार्थ आझाद मैदानात दाखल दाखल झालं आहे. हजारोंच्या संख्येने यावेळी मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झाल्याने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त याठिकाणी करण्यात आला आहे.