Manorama Khedkar : मनोरमा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई! पिस्तुल आणि गाडी पोलिसांकडून जप्त…
Manorama Khedkar : मनोरमा खेडकर यांचे पिस्तूल आणि कार पुणे ग्रामीण पोलिसांनी जप्त केली आहे. खेडकर यांच्या राहत्या घरामधून पिस्तुल आणि चारचाकी गाडी पौड पोलिसांनी जप्त केली आहे.
जप्त करण्यात आलेली हीच पिस्तूल वापरून शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप मनोरमा खेडकर यांच्यावरती आहे आणि या संदर्भातला व्हिडीओ व्हायरल झालेला होता. आज पोलिसांनी हे पिस्तुल जप्त केले आहे.
पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरला गुरूवारी (ता.१८) सकाळी महाड येथील एका हाँटेलमधून अटक केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली होती. यावेळी खेडकरनी वापरलेली पिस्तूल आणि वाहन तसेच इतर आरोपींना अटक करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. Manorama Khedkar
त्याप्रमाणे मनोरमा खेडकरकडील पिस्तूल व लँड क्रुसर गाडी पौड पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर सकपाळ, पौडचे पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.