Manoj Soni : ब्रेकिंग! UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा, चर्चांना उधाण…

मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला की नाही याची पुष्टी झालेली नाही. परंतु, सोनी यांच्या राजीनाम्यामुळे अनेकप्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.


मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवल्याचे सांगितले जाते. २०१७ मध्ये ते आयोगाचे सदस्य झाले, त्यानंतर १६ मे २०२३ रोजी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. २०२९ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र पाच वर्ष आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. Manoj Soni

मनोज सोनी कोण आहेत?
मनोज सोनी यांना आता आपला अधिक वेळ गुजरातमधील स्वामिनारायण पंथाची शाखा अनुपम मिशनला घालवायचा आहे, या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. २०२० मध्ये दीक्षा घेतल्यानंतर ते अनुपम मिशनमध्ये निष्काम कर्मयोगी बनले.
मनोज सोनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. २००५ मध्ये जेव्हा ते ४० वर्षांचे होते, तेव्हा मोदींनी त्यांना वडोदरा येथील प्रसिद्ध एमएस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त केले होते. तेव्हा देशातील सर्वात तरुण कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळाला होता.
