ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, सलाईन लावली, सरकार आता तरी निर्णय घेणार का.?
जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणपणाला लावले आहेत. जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज नवव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, तरीही ते आपल्या निर्धारावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडायचे नाही असा निर्धारच त्यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. अंगात ताकद राहिली नाही. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आहे. त्यामुळे उपोषण स्थळीच जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली आहे.
पहाटेच त्यांना सलाईन लावली आहे. त्यांच्याभोवती कार्यकर्ते जमले आहेत. तर जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची वार्ता पसरल्याने जालना, औरंगाबादसह आजपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे यायला निघाले आहेत. त्यामुळे आज अंतरवाली सराटी येथे आंदोलकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, जालना येथील झालेल्या लाठी हल्ल्यानंतर सरकार विरोधात मराठा समाजाची संतापाची भावना वाढली आहे. मराठा आरक्षणावरून आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.चार वर्षांपासून थंडावलेले आंदोलन पुन्हा चिघळले आहे.