Manoj Jarange : सर्वात मोठी बातमी! आता मनोज जरांगे दिल्लीत आंदोलन करणार? शिंदे सरकारच्या अडचणीत वाढ….
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी (ता .२०) विशेष अधिवेशन बोलावलं. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, दुसरीकडे सरकारने आमची फसवणूक केली असून आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवंय, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अशातच आता मनोज पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे. Manoj Jarange
मनोज जरांगे यांनी आज (ता.२१) दुपारी १२ वाजता जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. तत्पूर्वी बैठकीआधीच जरांगे यांनी राज्य सरकारला दिल्ली आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
राज्य सरकार खरंच शहाणे असेल, तर त्यांनी ओळखावे की मराठा पूर्वीसारखा राहीला नाही. तो आता शहाणा झाला आहे. आरक्षणासाठी आम्ही कुठेही शांततेत आंदोलन करायला तयार आहोत. त्यामुळे राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलजावणी करून आतातरी कायदा पारित करावा, नसता आंदोलनाची दिशा ठरलीच म्हणून समजा.
आता पुढचं आंदोलन कदाचित महाराष्ट्रापेक्षा बाहेर होणार आहे. आता नुसता महाराष्ट्र हादरवून काही फायदा नाही. आता मराठा आंदोलन लाल किल्ल्यावर जाणार, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.
मराठा समाजाची एकदा बैठक सुरू झाली, तर आंदोलनाचा निर्णय ठरलाच म्हणून समजायचं आणि निर्णय ठरला, तारीख ठरली, की मराठे आंदोलनाच्या तयारीला लागले म्हणून समजायचे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असेही जरांगे यांनी ठणकावून सांगितलं आहे.