Manoj Jarange Statue : सेम टू सेम मनोज जरांगे! पुण्यातील बाप-लेकाने उभारला जरांगेंचा मेणाचा पुतळा, जाणून घ्या…
Manoj Jarange Statue पुणे : गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या मनोज जरांगे पाटील चर्चेत आले आहे. जरांगे यांच्या याच आंदोलनाची दखल घेत आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने पुण्यातील एका बाप-लेकाने चक्क हुबेहूब मनोज जरांगे यांच्या सारखा दिसणारा मेणाचा पुतळा तयार केला आहे. याची चर्चा आता रंगली आहे.
पुण्यातील एकविरा कार्ला येथे वॅक्स मूजियममध्ये मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा साकारण्यात आलाय. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. ठीकठिकाणी मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केले जात आहे.
मुंबईकडे निघालेल्या त्यांच्या पायी दिंडीचा लोणावळ्यात चौथा मुक्काम होणार आहे. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी, यासाठी प्रत्येक मराठा होईल तो प्रयत्न करत आहे. अशातच पुण्यातील मावळ तालुक्यातील बाप-लेकाने मनोज जरांगे यांच्या सारखा दिसणारा मेणाचा पुतळा तयार केला आहे. Manoj Jarange Statue
पाच फूट सात इंचाचा पुतळा केला तयार..
कार्ला येथील अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बाप लेकांनी हा मेणाचा पुतळा तयार केला आहे. यासाठी त्यांना तीन महिन्यांचा वेळ लागला. मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून, पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे.
तर, हुबेहूब जरांगे पाटील साकारण्याचा प्रयत्न म्हाळसकर कुटुंबीयाने केलाय. त्यामुळे, हा पुतळा पाहण्यासाठी अनेक मराठा युवक येथे येऊ लागलेत. तर, जरांगे यांच्या पुतळ्यासोबत सेल्फी घेण्यासाठी देखील तरुण गर्दी करतांना पाहायला मिळत आहे. या पुतळ्याची आता राज्यभरात चर्चा सुरु आहे.