मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईत धडकला ; आझाद मैदानात लाखो मराठा बांधव..

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी ते आज आपल्या लाखो मराठा बांधवांसह आझाद मैदानात दाखल झाले आहेत. मैदानावर मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. आंदोलक हे मोठ्या संख्येने आझाद मैदानावर पोहोचले आहेत. पोलिसांनी काही नियम आणि अटी लावून या आंदोलनाला परवानगी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण करत आहेत. आता त्यांनी थेट मुंबई गाठली आहे. दुसरीकडे ओबीसींचा या आरक्षणाला विरोध आहे. जर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळाले तर तो आमच्यावर मोठा अन्याय आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी महासंघाने दिला आहे. दरम्यान दुसरीकडे सरकारच्या शिष्टमंडळाला ही मनोज जरांगेची समजूत काढण्यात अपयश आलं आहे. ते मोठा ताफा घेऊन आझाद मैदानावर दाखल झाले आहेत.
आझाद मैदानावर जरांगे पाटील यांना फक्त आज आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे. पोलिसांनी पाच हजार लोकांच्या परवानगी या आंदोलनासाठी दिली आहे. मनोज जरांगे पाटील हे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबईत दाखल झाले. कालच त्यांनी स्पष्ट केले की, गोळ्या झाडल्या तरीही आम्ही मागे फिरणार नाहीत. ते आंदोलनावर पूर्णपणे ठाम असल्याचे स्पष्ट केल आहे.
