मनोज जरांगे पाटील यांचे राज्य सरकारला पत्र! म्हणाले, माझं पोलीस संरक्षण…

बीड : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे गेल्या काही दिवासांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे एकमेकांवर थेट टीका करताना दिसत आहेत.

मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मनोज जरांगे यांनी केल्यानंतर या दोन्ही नेत्यांत उघड संघर्ष पाहायला मिळाला. आता मनोज जरांगेंनी त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी सरकारकडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. स्वतःचे पोलीस संरक्षण नाकारत, आपले संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे.काल जालन्यात पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे मनोज जरंगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी अर्जाद्वारे ही विनंती केली आहे.

या अर्जामध्ये आपल्या घातपाताच्या कटाचा मुख्य सूत्रधार हे धनंजय मुंडेच असल्याचं म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांना सरकार वाचवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. तसेच पोलीस संरक्षण तत्काळ काढण्याची विनंती देखील त्यांनी सरकारकडे केली आहे.
त्यामुळे एकूणच मनोज जरांगे पाटलांच्या या आरोपांकडे सरकार नेमके गांभीर्याने कधी पाहणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे सरकार मनोज जरांगेंची मागणी मान्य करेल, अशी कोणतीही शक्यता सध्या दिसत नाही.