Manoj Jarange Patil : राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण! मनोज जरांगे देणार सर्वांनाच धक्का? महत्वाची माहिती आली समोर…


Manoj Jarange Patil : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

राज्यातल्या राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच जालन्यामध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला जालन्यातील मराठा आंदोलक पदाधिकारी देखील उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Manoj Jarange Patil

जालन्यातून लोकसभेला उमेदवार द्यायचा का नाही किंवा स्वत: निवडणूक लढवायची का? याचा उद्या गावागावातून अहवाल येणार आहे, त्यानंतर पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर करेन, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागणार का? यावर चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तसेच काय होणार याकडे सर्वांचे नजरा लागले आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!