Manoj Jarange Patil : अंतरवलीत जाणार, घरी जाणार नाही, दिवाळीही साजरी करणार नाही – मनोज जरांगे पाटील


Manoj Jarange Patil  : मला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतोय. मी आज जालन्यातील अंतरवली सराटीत जाणार आहे. गावात जाईल. पण घराचा उंबरठा ओलांडणार नाही. जोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी घराच्या उंबऱ्यावर पाय ठेवणार नाही, असं सांगतानाच यंदा मी दिवाळीही साजरी करणार नाही.

माझ्या बांधवांनी आत्महत्या केलेल्या असताना आणि त्यांच्या घरात अंधार पसरलेला असताना मी दिवाळी कशी साजरी करू?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. Manoj Jarange Patil

मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि समाजाची एकजूट करण्यासाठी १५ ते २३ तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण आणि परत मराठवाडा अशा माझ्या गाठीभेटी असणार आहेत. माझी तब्येत ठणठणीत आहे.

आता मी अंतरवालीला निघालोय. पण घराकडे जाणार नाही. दिवाळी साजरी करणार नाही. मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, दु:खाचं सावट आहे. त्यामुळे आनंद कसा साजरा करणार? त्यामुळे वैयक्तिक दिवाळी साजरी करणार नाही. डिस्चार्ज आज होणार आहे. पण रात्रीच आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबातील लोकांना भेटून आलो, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

सरकारशी बोलतोय. सरकार आमच्याशी बोलत आहे. आमचा सरकारवर काहीच दबाव नाही. मी शांततेत गाठीभेटी घेत आहे. लोकांचे आशीर्वाद घेत आहे. या पलिकडे काही नाही. कोण उद्रेक करणार हे सरकारला माहीत आहे. साखळी उपोषण हे शांततेचे अस्त्र आहे

. जगात तेच वापरले जाते. जर त्याला सरकारचा किंवा कुणाचा आक्षेप असेल तर त्यात एवढे दु:ख नाही, असे सांगतानाच मुख्यमंत्री कार्यालयाने अंतरवालीला जाण्याच्या आत पत्र देऊ किंवा तिथे गेल्यावर देऊ असे म्हटले आहे. अंतरवालीत मी दोन दिवस आहे. दोन दिवसांनंतर बघू, असे जरांगे पाटील म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!