Manoj Jarange Patil : नव्या वर्षात मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरणार! आमरण उपोषणाची घोषणा, तारखही केली जाहीर…


Manoj Jarange Patil :  रविवारी महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथ विधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला आहे.

त्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याच जाहीर केलं आहे. त्यांनी नव्या वर्षात कधीपासून आमरण उपोषण सुरु करणार, ती तारीख जाहीर केली आहे.

सरकारला वाईट वाटेल, पश्चाताप होईल, इतकं भयंकर आंदोलन होईल. मराठा समाजाच्या एकजुटीने सरकारचे डोळे विस्फारतील” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी राज्यभरातील मराठ्यांना अंतरवली-सराटील एकत्र जमण्याच आवाहन केले आहे.

एकाही मराठ्याने घरी थांबायच नाही, सर्वांनी इथे यायचं. अंतरवली-सराटीत तुफान ताकदीने मराठ्यांनी एकत्र यायचं. जगात मराठ्यांच्या एकजुटीला तोड नव्हती, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची नवी तारीख जाहीर केली आहे.

तसेच २५ जानेवारी २०२५ पासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्यांना स्वेच्छेने उपोषणाला बसायच आहे, ते बसू शकतात. पण कोणावरही जबरदस्ती नसेल असं त्यांनी स्पष्ट केले आहे. Manoj Jarange Patil

महत्त्वाच म्हणजे यावेळी आमरण उपोषण फक्त अंतरवली सराटीतच होईल. कुठल्याही अन्य गावात साखळी उपोषण होणार नाही, मराठ्यांनी त्यांची सर्व ताकद अतरवली सराटीतच दाखवून द्यायची आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात स्थगित केलेलं उपोषण आंदोलन पुन्हा सुरु करतोय. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली, त्याला एक वर्ष पूर्ण होईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!