Manoj Jarange Patil : येवल्याचा डुप्लिकेट नेता कुठंय? मनोज जरांगे पाटील छगन भुजबळांवर का संतापले?


Manoj Jarange Patil : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक राजकीय नेते राजकीय तोफ डागणार आहे. ठाकरे गट, शिंदे गट आणि पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे.

त्याचबरोबर यावर्षी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा देखील यावर्षी दसरा मेळावा होणार आहे, बीडमधील नारायण गड याठिकाणी जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. त्यापूर्वी जालनामध्ये जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे.

महाविकास आघाडीची सत्ता आली तर ते तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देतील, असे त्यांच्याकडून लिहून घ्या, असे आव्हान महायुतीमधील नेते देत होते. महायुती सरकारने नुकताच १५ जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याची शिफारस केली.

त्यामध्ये मराठा समाज नसल्याने मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला? आता ओबीसी नेते कुठे झोपले आहेत? आता या जातींना विरोध का नाही? की त्यांना ओबीसीत घेताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतले. Manoj Jarange Patil

जरांगे पुढे म्हणाले, १५ जातींचा ओबीसीत समावेश करताना आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही का? छाती बडवून घेणारा तो येवल्याचा नेता कुठे गेला? मराठ्यांना आरक्षण देताना यांना त्रास होतो. एवढा जातीयवाद कशासाठी? मराठ्यांची फसवणूक केली जात आहे, असे जरांगे पाटील म्हणाले आहे.

जरांगे म्हणाले, मागच्या दोन महिन्यांपासून सरकार छोट्या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करणार आहे, हे आम्हाला माहीत होते. पोटजाती म्हणून तुम्ही समावेश केला. मग मराठा-कुणबी एक असताना का नाही समावेश केला, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!