Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, मराठा समाजाला केलं ‘हे’ आवाहन…

Manoj Jarange Patil : सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेत. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.

डॉक्टर आणि मराठा बांधवांच्या विनंतीनंतर मध्यरात्री जरांगे पाटील यांनी उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी आज उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा आग्रहाने मांडली. त्यानंतर उपोषण मागे घेण्याबाबात उपस्थित मराठा बांधवांना विचारलं.
त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय मनोज जरागेंनी घेतला. आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा नेत्यांच्या मुलांना मोठं करू नका, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे, असं जरांगे म्हणाले. Manoj Jarange Patil

राज्यभरातून मराठा समाज अंतरवालीकडे येत आहेत. त्यामुळे आता जरांगे पाटील ४ वाजता उपोषण सोडणार आहेत. उपोषण स्थगित करणार आहेत. जरांगेंना भेटण्यासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मुस्लिम समाजबांधवांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती केली. यावेळी या मुस्लिम बांधवांना अश्रू अनावर झाले होते.