Manoj jarange Patil : मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीपासून राहण्यापर्यंत कसं असेल नवी मुंबईतील नियोजन? जाणून घ्या…


Manoj jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. जरांगे आज पुण्यातल्या खराडीमधून लोणावळ्याकडे रवाना होतील. पिंपरी-चिंचवडमार्गे मराठा आंदोलक लोणावळ्यात दाखल होतील. रात्रीचा मुक्काम लोणावळा गावात होईल. लोणावळ्यात सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आंदोलनावर ठाम आहेत..

मनोज जरांगे यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार केला आहे. तसेच समाजाशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आजपासून मुंबईकडे पायीदिंडीने मनोज जरांगे प्रस्थान करणार आहेत. यासाठी नवी मुंबईत सुद्धा जंगी तयारी करण्यात आली आहे.

असा असेल नवी मुंबईतील नियोजन जाणून घ्या..

पनवेलवरून उलवे मार्गे नवी मुंबईत पाम बीच मार्गावर प्रवेश असेल
पाम बीच मार्गावरून नेरूळ करत वाशीमध्ये आंदोलक येणार
पाम बीच रस्त्यावर पुरूष मराठा आंदोलन आणि त्यांच्या गाड्या थांबतील.

रात्री मनोज जरांगे पाटील कांदा बटाटा मार्केट मध्ये राहणार
सकाळी २६ जानेवारी निमित्त झेंडा वंदन करून निघणर ..

वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेवून मुंबईच्या दिशेने निघणार..
महिला वर्ग एपीएमसीमध्ये राहणार..

जेवणाची , राहण्याची सोय तसेच मोबाईल टॅायलेट आणि आंघोळीसाठी टँकर उपलब्ध
आज नवी मुंबईत मराठा बांधवांचा मुक्काम असल्याने मोबाईल टॅायलेटची मोठी सोय
एपीएमसी परिसरात हजारोच्या संख्येने मोबाईल टॅायलेटची व्यवस्था

आंदोलक महिला वर्ग एपीएमसी मध्ये थांबणार असल्याने त्यांची गैरसोय होवू नये यासाठी टॅायलेटची उभारणी
एपीएमसी प्रशासन, नवी मुंबई महानगरपालिकेकडून सोय उपलब्ध

तसेच मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा बांधव, लहान मुलं, महिला रस्त्याच्या दुतर्फा उभी होती. मराठा बांधव माझ्यासाठी गेले अनेक तास रस्त्यावर थांबले आहेत, यांना भेटल्याशिवाय मी जाऊ शकत नाही, ही लोकच माझी ताकद असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मोजता येणार नाहीत अशा पद्धतीने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होत आहेत. Manoj jarange Patil

दरम्यान, ते म्हणाले की, २६ तारखेला आम्ही मुंबई पोहोचणार आहे. जोपर्यंत आमच्या बातम्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. न्यायालयात जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे, आमचे वकील आमची बाजू मांडतील. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेलं नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!