Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरू, आता जाहीर करणार पुढील रणनीती, पुन्हा उपोषणही करणार?


Manoj Jarange Patil जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जालना येथील आंतरवाली सराटी गावात आज भव्य अशी जाहीर सभा होत आहे. यावेळी मनोज जरांगे यांचे भाषण होणार आहे. मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जालना या ठिकाणी त्यांची भव्य अशी जाहीर सभा होणार आहे.

शुक्रवारी म्हणजेच काल दुपारपासूनच लाखो मराठा बांधव वेगवेगळ्या जिल्ह्यांतून रेल्वे, बसने गावात दाखल होत आहेत. आंतरवालीत होत असलेल्या मराठा संवाद मेळाव्यात मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान मनोज जरांगे पाटील मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत.

आतापर्यंत देशांमध्ये कुठेही एवढी गर्दी झाली नसेल एवढी गर्दी या सभेला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही सभा आज इतिहास घडवणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

विजयादशमी नंतर आमरण उपोषण.. ?

मराठा समाजाला ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतले आरक्षण द्या, मराठा समाज मागास आहे. त्यामुळे ही प्रमुख मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील आंतरवालीच्या सभेत मराठा बांधवांसमोर आंदोलनाची पुढची दिशा सांगतील.

प्रचंड मोठ्या मेळाव्यातून सरकारला समाजाची ताकद दाखवून द्यायची, पुढच्या १० दिवसांत आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आणखी मोठा दबाव आणायचा आणि या मेळाव्यानंतर लगेचच उर्वरित महाराष्ट्र दौऱ्यासाठी बाहेर पडायचे..

आरक्षणासाठी सरकारला दिलेली १० दिवसांची मुदत विजयादशमीला संपणार असल्याने त्याच दिवशी पुन्हा आमरण उपोषण सुरू करायचे, असा पुढचा अॅक्शन प्लॅन जरांगे पाटील आंतरवालीच्या सभेत देऊ शकतात.

या मुद्द्यांवर असणार मनोज जरांगे पाटील यांचे भाषण..

सरकारला देण्यात आलेल्या ४० दिवसांची मुदत संपण्यापूर्वी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
शनिवारी मेळावा संपताच रविवारपासूनच जरांगे पाटील आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करू शकतात.
आंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण सुरू राहील. व्याप्ती वाढवण्यावर जरांगे पाटलांचा भर असू शकेल.

जरांगे पाटलांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. ती २४ ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे २४ पासून ते पुन्हा आमरण उपोषण सुरू करू शकतील.
मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतले व ओबीसीतून आरक्षणाचा शासन निर्णय हातात घेऊनच ते आंदोलन मागे घेणार असल्याचे सांगू शकतात.
काही मंत्री आरक्षणविरोधी वक्तव्ये करीत आहेत, त्यांचाही समाचार घेऊ शकतात.

मराठा समाज मागास सिद्ध होण्यासाठी २६ पैकी किमान १३ गुण आवश्यक होते. गायकवाड आयोगाच्या अहवालात समाजाला २१.५ गुण दिले आहेत. याचा उल्लेख करू शकतात.
मराठा आंदोलनात सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकते असा आरोप मनोज जरांगे पाटील सातत्याने करीत आहेत. त्यासंदर्भात ते काही गौप्यस्फोट करू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!