Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात, ‘या’ जिल्ह्यात दौरा, दौऱ्याला मोठा प्रतिसाद…
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. त्यांनी १३ जिल्ह्यांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व मराठा समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी हा दौरा आयोजित केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. Manoj Jarange Patil
जरांगे पाटील आता महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या अल्टीमेटमला येत्या १४ ऑक्टोबर रोजी ३० दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमिवर १४ ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारला जागं करण्यासाठी हा कार्यक्रम असणार असून यामध्ये जरांगे मराठा समाजाला संबोधित करतील. तसेच मराठा आरक्षणासाठी जरांगे महाराष्ट्रभर दौरा देखील करणार आहेत.
दरम्यान, त्यांनी १३ जिल्ह्यांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व मराठा समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी हा दौरा आयोजित केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे Manoj Jarange Patil यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यासोबतच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार असून नंतर मराठवाड्याबाहेर नगर, नाशिक, सोलापूर, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याचा पहिला थांबा परभणीच्या जिंतूर येथे होणार आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळावेत या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. त्यांच्याकडून राज्य सरकारला ४० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिकाही घेण्यात आली.