Manoj Jarange Patil : राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची अखेर विधानसभा निवडणुकीतून माघार….

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक २०२४ मधून माघार घेतली आहे. मनोज जरांगे यांनी आज सकाळी आंतरवली सराटी इथं माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून याबाबतची घोषणा केली आहे.
कोण्या एका जातीच्या भरोश्यावर निवडणूक लढता येत नाही, असे यावेळी मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. समाज बांधवांकडून उमेदवारांची यादीचे न आसल्याने आपण विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवार देणार नाही. मात्र आता फक्त पाडापाडी करणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र कोणाला पाडणार, याबाबतचा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. Manoj Jarange Patil
मित्र पक्षांची यादी आली नसल्याने निवडणूक लढणार नसल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (ता.४) स्पष्ट केले. मित्र पक्षांची यादी आलेली नाही.
एकाच जातीवर कुणी निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळे निवडणूक लढणार नाही, आता उमेदवार पाडणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच मराठा उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. आता याला पाड, त्याला पाड म्हणण्याची इच्छा नाही. असेही ते म्हणाले आहे.