Manoj Jarange Patil : शेतकऱ्याने चक्क बैलावर कोरली मनोज जरांगे पाटलांची प्रतिमा, गावातल्या बैलपोळ्याने साऱ्यांचे लक्ष वेधले
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सरकारला घाम फोडणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यांनी जवळपास १७ दिवस उपोषण केले. (Manoj Jarange Patil )
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचा लढा लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले. त्यांनी उपोषण सोडल्यानंतर सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यावर एका गावात चक्क बैलाच्या अंगावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा रेखाटण्यात आली. तसेय या बैलाची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.
धाराशिव मधील दहिफळ या गावांमध्ये बैलाच्या अंगावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे. विविध रंगांच्या साह्याने बैलाच्या अंगावर जरांगे पाटील यांचे चित्र काढण्यात आले आहे. गावातून वाजत गाजत या बैलाची मिरवणूक करण्यात आली आणि या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गावातून मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा असलेली मिरवणूक निघाल्यावर सर्वांनीच कौतुक केले. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करून सरकारी यंत्रणा हलवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे.