Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला थेट इशारा, म्हणाले, २४ तारखेच्या आत आरक्षण द्या, नाहीतर…


Manoj Jarange Patil : मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी ३० दिवसांची मुदत मागितली होती.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय आता गांभीर्याने घ्यावा जर येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर मराठ्यांचे शांततेत सुरू असलेल आंदोलन तुम्हाला पेलणार नाही. असा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सरकारला दिला आहे. ते शिवनेरी किल्ल्यावरून बोलत होते. Manoj Jarange Patil

आज जरंगे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील खेड आणि बारामती तालुक्यात जंगी सभा होणार आहे. या सभेसाठी जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारला हा गंभीर इशारा दिला आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय आता गांभीर्याने घ्यावा. येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. चालढकल करण्याचा प्रयत्न केला, तर मराठ्यांचे शांततेत सुरू असलेलं आंदोलन तुम्हाला पेलणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. आम्ही आरक्षणासाठी ४ दिवसांचा वेळी देखील दिला होता मात्र राज्य सरकारने ३० दिवसांचा वेळ मागितला. त्यानंतर आम्ही यापुढे १० दिवसांचा वेळ वाढवून दिला असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!