Manoj Jarange Patil : मोठी बातमी! आमरण उपोषण मागे घेत मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा…


Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार पेटला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे.

उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा असं ते मराठा बांधवांना म्हणाले आहेत. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर दोन-तीन दिवसानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाहीये. यासाठी ते आता स्तत:च लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. गावातील महिलांच्या हातून रस पेऊन ते उपोषण मागे घेणार असल्याचं कळतंय. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत. Manoj Jarange Patil

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा अंतरवाली सराटी सारखी लाठीचार्जची घटना घडवून आणायची होती. त्यांना राज्यात दंगल घडवून आणायची होती. मी तसं घडण्यापासून वाचवलं असा दावा जरांगे पाटील यांनी केला. भांबेरीत ५ हजार महिला गोळा झाल्या होत्या.

फडणवीस यांना लाठीचार्ज घडवून आणायचा होता. मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवलं, रात्री राज्यातला मराठा सगळा पेटून उठला असता. पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसवर झाला असता असंही जरांगे पाटील म्हणाले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!