Manoj Jarange Patil : भाजप नेत्याने मनोज जरांगेंकडे मागितली विधानसभेची उमेदवारी, भाजप नेत्यांचे टेन्शन वाढलं..

Manoj Jarange Patil : कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. सरकारने अद्याप मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात लढण्याची भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करून सत्ताधारी आमदारांना पाडण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. अशातच भाजपच्या नेत्याना मनोज जरांगेंची भेट घेतली आहे आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. Manoj Jarange Patil
अशातच आता विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात भाजप नेत्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगेंची भेट घेत त्यांनी बीड शहरातून विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. रमेश पोकळे यांनी भाजपकडून पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता रमेश पोकळे आता बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत.