Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे आक्रमकपणे फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर निघाले, पण अर्ध्या रस्त्यातूनच फिरले माघारी, नेमकं घडलं काय?


Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. जरांगे थेट सागर बंगल्याच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे पाटील यांनी काल आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

आता एक मोठी बातमी समोर आली आहे. जरांगे यांनी सागर बंगल्यावर जाण्याचा आपला निर्णय तात्पुरता मागे घेल्याची माहिती मिळत आहे.अंतरवाली सराटी गावात जाऊन आम्ही बैठक घेऊ त्याचबरोबर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.

सध्या जरांगे पाटील यांचा ताफा जालन्याच्या भांबेरी गावातून अंतरवाली सराटीकडे निघाला आहे. आज दुपारी अंतरवाली सराटी या ठिकाणी बैठक होणार आहे. या बैठकीला अनेक मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर संचारबंदी उठवा मुंबईमध्ये येऊन दाखवतो असं आव्हान देखील जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. Manoj Jarange Patil

जरांगे पाटील म्हणाले, राज्य सरकारने आम्हाला मुंबईमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी ठिकठिकाणी ५ ते १० हजार पोलिसांचा बंदोबस्त उभा केला असून ते आम्हाला मुंबईमध्ये शिरू देणार नाहीत. जर मी मुंबईमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तर मराठा आंदोलकांना त्रास होईल. मी कोणत्याही मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर केले आरोप..

देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे.

फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होते. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!