Manoj Jarange Patil : मनोज जरांगे खोटा माणूस, तो राष्ट्रवादीचा माणूस, १८ वर्षांपासून जरांगेच्या सोबत असलेल्या सहकाऱ्याचे गंभीर आरोप

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, कोणत्याही पक्षाचे आपले संबध नाहीत असे सांगत आहेत. मात्र, जरांगे पाटील हा राष्ट्रवादीचा माणूस आहे. शरद पवार आणि राजेश टोपेचा माणूस आहे असा थेट आरोप जरांगे पाटील याचे जुने सहकारी बाबुराव वाळेकर यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बाबुराव वाळेकर म्हणाले,मनोज जरांगे पाटील हा राष्ट्रवादीचा माणूस असून शरद पवार आणि राजेश टोपेचा माणूस आहे असा थेट आरोप जरांगे पाटील यांचे जुने सहकारी बाबुराव वाळेकर यांनी केला आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.
जरांगे यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप केले आहेत आणि यामध्येच आता बाबुराव वाळेकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

बाबुराव वाळेकर यांनी गोप्यस्फोटही केला, ते म्हणाले, जरांगे पाटील यांनी महिलांना ढाल म्हणून पुढे केले. जरांगेंनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. त्यांनी जिथे जिथे आंदोलन केले तिथे राष्ट्रवादी सोबत होती. स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणांचा वापर कसा करायचा हे जरांगे पाटलांना चांगलेच माहित आहे. असं देखील बाबुराव वाळेकर म्हणाले आहेत. Manoj Jarange Patil
जरांगेंसोबत मी १७ ते १८ वर्षांपासून काम करत आहे. हा माणूस समाजाची दिशाभूल करतोय हे मी उघडं करणार आहे असे बाबुराव वाळेकर म्हणाले. गळ्यात कवड्याच्या माळा टाकून लोकांना हात दाखवतात. हार तुऱ्यांसाठी हा माणूस भुकेला आहे.
आत्महत्या केलेल्या गावात शोककळा असताना भेटायला जायचे आणि सत्कार घ्यायचे असे त्याचे उद्योग आहेत. जरांगेच्या आमिषाला कोणी बळी पडू नका. २०१९ पासून त्यांना पाठिंबा देण्यात आला तेव्हापासून ते राष्ट्रवादीत आहेत. आता जरांगे सोबत आहेत ते सर्व राष्ट्रवादीचे आहेत असा थेट आरोप त्यांनी केला.