Manoj Jarange : मराठ्यांच वादळ आलंय! कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगे यांचा प्रवास सुरूच, पहाटे लोकांकडून सत्कार, आता मुंबई हाकेच्या अंतरावर…

Manoj Jarange : पुण्यामध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे, १० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान घसरलेले आहे. इतक्या कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगे नावाचं वादळ थांबलेलं नाही. बुधवारी मध्यरात्री जरांगेची पायी दिंडी पुण्यात धडकली होती. त्यानंतर ठिकठिकाणी त्यांचं स्वागत झालं. मनोज जरांगे रात्रीही थांबले नाहीत.
आतापर्यंत माझ्यासोबत या मोर्चामध्ये जवळपास ७० ते ८० लाख लोक आहेत. मोजता येणार नाहीत अशा पद्धतीने मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे २६ तारखेला आम्ही मुंबईत दाखल होणार.
जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार देखील आम्हाला आहे. आमचे वकील आमची बाजू मांडतील. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. Manoj Jarange
पुण्यात आज पहाटेही लोक त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. महिला, पुरुष आणि तरुण मंडळीचं प्रमाण मोठ्या प्रमणात होतं. काही ठिकाणी पहाटे जेसीबीच्या मदतीने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. सध्या मनोज जरांगे यांचं हे वादळ लोणावळ्यात आलेय. येथे विश्रांती घेतल्यानंतर सभा होणार आहे. उपस्थितीतांना संबोधित केल्यानंतर हे वादळ मुंबईच्या दिशेने कूच करेल.
मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणाच्या मागणीसाठीची पायी दिंडी पुण्यातील वाघोली परिसरातून बुधवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाली. चंदननगर, येरवडा, शिवाजीनगर, औंध असा प्रवास करत जरांगेंचा मोर्चा रात्रीचे पावणेचार वाजलेले असताना डांगे चौकात पोहोचला.
पुढे बिर्ला हाँस्पीटल, चाफेकर चौक, भक्ती शक्ती चौक असा प्रवास केला. जागोजागी चौकाचौकात समर्थक स्वागतासाठी उभे होते. गर्दी प्रचंड झालेली. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीतही लहान मुले, तरुण, वयोवृद्ध सर्व वयोगटातील लोक जरांगेंच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उभे आहेत.
दरम्यान, हे आंदोलन मुंबईत जाईपर्यंत तीन कोटी लोक सहभागी होण्याचा दावा करण्यात येत आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहे. मुंबईत लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कायदा सुव्यवस्था, सामाजिक शांतता भंग होण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊनच गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.