Manoj Jarange Health Update : ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची तब्येत खालावली, पाय सुजले, ताप आला, सभाही रद्द…

Manoj Jarange Health Update : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये शुक्रवारी (२६ जानेवारी) पहाटे मराठा समाजाची पदयात्रा पोहचली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

नवी मुंबईत दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. पदयात्रेमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या पायाला सूज आली असून त्यांना सकाळपासून ताप देखील आला आहे. त्यामुळे जरांगे यांची माथाडी भवन या ठिकाणी होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. जरांगे पाटील सध्या एपीएमसी मार्केट मधील प्रशासकीय इमारतीमध्ये आराम करत आहेत.
सकाळी ९ वाजता जरांगे पाटील वाशी या ठिकाणी शिवाजी चौकात येऊन त्या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत आणि या सभेनंतर ते आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होणार आहेत. यादरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा जरांगे यांच्या भेटीसाठी येणार आहे. Manoj Jarange Health Update

गुरुवारी देखील सरकारच्या शिष्टमंडळाने लोणावळा येथे जरांगे यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीत मराठा आंदोलनावर कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मुंबईत येऊन मराठा आरक्षण घेणारच असं जरांगे यांनी ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे आज आरक्षणाबाबत काय तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे