मनीष सिसोदियांना 5 दिवसांची CBI कोठडी…!

नवी दिल्ली : दिल्ली न्यायालयाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना 5 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. सीबीआयने रविवारी सलग 8 तासांच्या चौकशीनंतर सिसोदिया यांना अटक केली होती. आज त्यांना अव्हेन्यू कोर्टात सादर करण्यात आले होते.
जुलै 2022 मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली. सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने सिसोदियाविरुद्ध तपास सुरू केला.
सीबीआय ने न्यायालयात सिसोदियांची 5 दिवसांची कोठडी मागितली होती ती कोर्टाने ती मान्य केली आहे. सिसोदिया तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप तपास संस्थेने केला आहे.
सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टी (आप) दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने करत आहे. नेते-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.