मनीष सिसोदियांची सर्वोच्च न्यायालयात धाव…!

नवी दिल्ली : अबकारी घोटाळा प्रकरणी पाच दिवसांच्या सीबीआय कोठडीत असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या वतीने वकिलांनी अटकेविरोधात आणि सीबीआयच्या कामाच्या पद्धतीविरोधात याचिका दाखल केली आहे.
मनीष सिसोदिया यांच्या वकिलाने या खटल्याची सुनावणी लवकर व्हावी, अशी विनंती न्यायालयाला केल्याचे मानले जात आहे. या याचिकेचा उल्लेख मुख्य न्यायमूर्तींसमोर केला असता, न्यायालयाने आज दुपारी 3.50 वाजता सुनावणीसाठी वेळ दिली आहे.
अबकारी धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना न्यायालयाने पाच दिवसांसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) ताब्यात दिले. तपासाच्या दृष्टीने रिमांड आवश्यक असल्याचे न्यायालयाने मान्य केले. दुसरीकडे, तत्कालीन नायब राज्यपालांनी अबकारी धोरण बदलल्याचे सिसोदिया यांच्याकडून सांगण्यात आले.