मणिपूर पुन्हा पेटलं! ४०० लोकांच्या जमावाने एसपी कार्यालयावर हल्ला..!!
इंफाळ : मणिपूरमधील चुराचंदपूरच्या एसपी कार्यालयावर जमावाने हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की ४०० लोकांच्या जमावाने हल्ला केला आहे. जमावाने पोलिस ठाण्यावरही दगडफेक केली आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचार थांबत नाही. एसपी कार्यालयावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. मणिपूरमधील परिस्थिती आता स्थानिक पोलिसांच्या हाताबाहेर गेली आहे. कायदा आणि सुव्यवस्था इथं पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यातच एक कुकी पोलिस कॉन्स्टेबलचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हा पोलिस आधीक्षकांचे कार्यालय जाळण्यात त्याचाही सहभाग असल्याचे दिसून आले आहे.
तसेच हा व्हीडीओ समोर येताच या पोलिस कर्मचा-याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, चिंतेची बाब ही आहे की ज्या ठिकाणी आज हिंसाचार आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी अर्थात दुरचांदपूर इथे मोठा हिंसाचार झाला होता.
त्यामुळं हा भाग सध्या खूपच संवेदनशील बनला आहे. यापूर्वी देखील इथं हिंसाचाऱ्यांच्या घटना समोर आल्या होत्या. यावेळी परिस्थिती अधिक चिघळली आहे कारण हिंसाचार करणा-यांनी दगडफेकही केली आहे. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आहे.