माणिक साहा यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली…!
आगरतळा : त्रिपुरामध्ये माणिक साहा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. माणिक साहा यांची सर्वानुमते आमदारांच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
सीएम माणिक साहा यांच्यानंतर संताना चकमा, प्रणजित सिंग, सुशांत चौधरी, रतन लाल नाथ, टिंकू रॉय, विकास देबबर्मा, सुधांशू दास आणि सुक्ला चरण नोआटिया यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तत्पूर्वी, आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हेही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. शपथविधी आधी माणिक साहा यांनी आगरतळा येथील लक्ष्मीनारायण हाऊसमध्ये प्रार्थना केली.
- भाजप-आयपीएफटी आघाडीला ११ जागांवर नुकसान
त्रिपुरामध्ये भाजप आणि आयपीएफटीने युती करून निवडणूक लढवली. त्यांना २०१८ च्या निवडणुकीच्या तुलनेत ११ जागांचे नुकसान झाले. त्यानंतरही या आघाडीने ३३ जागा जिंकून बहुमत मिळवले. राज्यात भाजपला ३२, तर आयपीएफटीला फक्त १ जागा मिळाली.
दसरीकडे, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सीपीआय(एम) आणि काँग्रेस आघाडीने राज्यात १४ जागा जिंकल्या आणि २ जागांचे नुकसान झाले होते. तर, टीपीएमने राज्यात १३ जागा जिंकल्या होत्या.
Views:
[jp_post_view]