मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल यांची गाडी चोरट्यांनी फोडली, ४० हजार रुपयांसह महत्वाची कागदपत्रे लंपास; पुणे-नगर रस्त्यावरील घटना


पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल यांच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये व इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना बुधवारी (ता.६) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान पुणे-नगर रस्त्यावरील अल्फा डायग्नोस्टिक समोर घडली आहे. चोरट्यांनी पर्ससह ४० हजारांची रोकड, डेबिट कार्ड, आधार व पॅन कार्ड लंपास केले आहे.

याप्रकरणी रेखा मंगलदास बांदल (वय. ४२, रा. बांदल कॉम्प्लेक्स मागे, शिक्रापूर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, रेखा बांदल या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस या जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत.

बुधवारी (ता.६) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या अमोल भोसले यांच्यासह खराडी येथील श्रीराम सोसायटीमध्ये मैत्री साम्राज्य ग्रुपने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या होत्या.

त्यावेळी त्यांनी त्यांची कार अल्फा डायग्नोस्टिक समोरील सार्वजनिक रोडवर पार्क केली होती. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या कारजवळ आल्या. त्यावेळी त्यांना कराचा डाव्या बाजूची काच फुटलेली दिसून आली.

दरम्यान, त्यांनी कारमध्ये पाहणी केली असता कारच्या मागील सीटवर ठेवलेले साहित्य गायब होते. चोरट्यांनी गाडीची काच फोडून मागिल सीटवरील सर्व साहित्य चोरुन नेले.

यामध्ये पर्समध्ये ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकड, पासपोर्ट , पॅन कार्ड , आधार कार्ड, दोन डेबिट कार्ड चोरट्यांनी चोरून नेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!