Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांनी १२ वर्षांनंतर केला हिशोब चुकता, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या..

Mangaldas Bandal : पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल हे नेहमीच उत्तर पुणे जिल्ह्यातील राजकीय आखाड्यात डावपेच टाकण्यात प्रसिद्ध आहेत. जाहीर व्यासपीठावरून बांदल अनेकांची धांदल उडवतात.

मंगलदास बांदल यांच्या पाठोपाठ शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप हे देखील आपल्या भाषण कौशल्याने प्रसिध्द आहेत. हे दोघेही एका व्यासपीठावर उपस्थित असले की, उपस्थितांचे कान या दोघांच्याही भाषणाकडे असतात. असाच प्रसंग करंदी (ता. शिरुर) येथील एका दशक्रिया विधी दरम्यान अनुभवायला मिळाला आहे. Mangaldas Bandal


यावेळी झाले असे की , करंदी (ता. शिरुर) येथील एक ९७ वर्षांचे आजोबा वृद्धपकाळाने गेल्याने त्यांचा दशक्रिया विधी गुरुवारी (दि. २) रोजी पार पडला. हा दुःखद प्रसंग सरपंच शारदा राजाभाऊ ढोकले यांच्या कुटुंबातील असल्याने या दशक्रिया विधीला अनेक राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावली.
दरम्यान माजी सभापती शंकर जांभळकर यांन श्रद्धांजलीपर भाषण करताना खाली बसलेल्या ग्रामस्थांनी मोठ्याने आपापसात बोलायला सुरुवात केली. तोच धागा पकडून सुभाष उमाप यांनी भाषण सुरू करत या कुटुंबातील शेतीच्या उत्पादनाची ख्याती सांगायला सुरुवात केली. यामध्ये २०११- १२ साली पिंपळे जगताप येथे सुरू झालेल्या बाजार समितीच्या उपकेंद्रांची त्यांनी आठवण करून दिली.
या उपकेंद्राच्या उद्घाटनाच्या अगोदर मंगलदास बांदल बाजार समितीचे सभापती असताना बाजार समितीच्या वतीने सर्वाधिक कांदा विक्रीला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याला अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी बक्षीस देणार असे तत्कालीन सभापती मंगलदास बांदल यांनी आश्वासन दिले होते.
त्या बक्षिसास दशक्रिया विधी असलेल्या आजोबांचा मुलगा पात्र झाला होता परंतु ते बक्षिस अद्याप मिळाले की नाही हे मला माहित नाही असे सांगत बांदल यांच्याकडे उमाप यांनी इशारा केला.
त्यानंतर मंगलदास बांदल माईक घेऊन बोलायला उभे राहिले आणि बाजार समितीच्या या पिंपळे जगताप येथील उपकेंद्राच्या उद्घाटनाला खोडा घालणाऱ्यांची नावं न घेता चांगलीच खरडपट्टी केली. केवळ शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला आणि मला फार शेतकऱ्याचा कळवळा आहे असं म्हणून चालत नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजे.
इथे उपस्थित असलेले काहीजण आपल्या नेत्यांनी उद्घाटनाला जाऊ नये यासाठी प्रयत्न करत होते. मी सभापती झालो हे त्यांच्या पचनी पडले नव्हते असं म्हणत बांदल यांनी बाजार समितीच्या उपकेंद्राचे उद्घाटन न झाल्याने बाजार समितीच्या वतीने जाहीर केलेले बक्षिस पात्र शेतकऱ्याला देता आले नाही परंतु हरकत नाही.
असे म्हणत बांदल यांनी भाषण सुरू असताना ५० हजार रुपयांचा बंडल सुभाष उमाप यांच्याकडे सुपूर्द करत त्यावेळी बक्षिसास पात्र झालेल्या बाबासाहेब सुदाम ढोकले या शेतकऱ्याला देण्याची विनंती केली. हे बक्षिस त्याच ठिकाणी बाबासाहेब ढोकले यांनी गावातील विद्यालयाच्या कंपाऊंडसाठी देणगी स्वरूपात देऊन सामाजिक संदेश दिला आहे.
त्यानंतर मंगलदास बांदल माईक घेऊन बोलायला उभे राहिले आणि बाजार समितीच्या या पिंपळे जगताप येथील उपकेंद्राच्या उद्घाटनाला खोडा घालणाऱ्यांची नावं न घेता चांगलीच खरडपट्टी केली. केवळ शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला आणि मला फार शेतकऱ्याचा कळवळा आहे असं म्हणून चालत नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजे. इथे उपस्थित असलेले काहीजण आपल्या नेत्यांनी उद्घाटनाला जाऊ नये यासाठी प्रयत्न करत होते.
मी सभापती झालो हे त्यांच्या पचनी पडले नव्हते असं म्हणत बांदल यांनी बाजार समितीच्या उपकेंद्राचे उद्घाटन न झाल्याने बाजार समितीच्या वतीने जाहीर केलेले बक्षिस पात्र शेतकऱ्याला देता आले नाही परंतु हरकत नाही. असे म्हणत बांदल यांनी भाषण सुरू असताना ५० हजार रुपयांचा बंडल सुभाष उमाप यांच्याकडे सुपूर्द करत त्यावेळी बक्षिसास पात्र झालेल्या बाबासाहेब सुदाम ढोकले या शेतकऱ्याला देण्याची विनंती केली. हे बक्षिस त्याच ठिकाणी बाबासाहेब ढोकले यांनी गावातील विद्यालयाच्या कंपाऊंडसाठी देणगी स्वरूपात देऊन सामाजिक संदेश दिला आहे.
