तरुणीला ब्लॅकमेक करत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवत पैसे अन् सोन्याची मागणी करणा-यास अटक.


लोणी काळभोर : ‘तुझं लफडं तुझ्या घरी सांगतो’ असे म्हणत १९ वर्षांच्या तरुणीला ब्लॅकमेक करुन वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत पैसे अन् सोन्याची मागणी करणा-या तरुणास फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पिडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून नील भरत निंबाळकर (वय १९, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी) याला अटक केली आहे. सदर प्रकार जुलै ते ३१ डिसेंबर २०२५ या पाच महिन्यांच्या कालावधीत घडला आहे.

एके दिवशी पिडित तरुणी रिक्षामधून प्रवास करत असताना ती दुसऱ्या एका तरुणासोबत बोलत असल्याचे नील निंबाळकरने पाहिले होते. त्यानंतर त्याने सदर तरुणीला “तुझ्या भावाला आणि बहिणीला फोन करून तू कोणासोबत फिरतेस, तुझं अफेअर आहे हे सगळ्यांना सांगतो,” असे म्हणत धमकावण्यास सुरुवात केली. घरच्यांना प्रेमसंबंधाची माहिती मिळू नये, यासाठी त्याने तरुणीला ब्लॅकमेल करत तिच्याकडे पैशांची मागणी केली. परंतु तिच्याकडे,पैसे नसल्यामुळे त्याने तिच्याकडून १०१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतरही तो वारंवार पैशांची मागणी करत होता.

तरुणीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिला धमकावत तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.यांमुळे पिडीत तरुणी मानसिक तणावाखाली आली. वारंवार होत असलेला तणाव तिला असह्य झालेने तिने फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नील निंबाळकर याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नलावडे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!