ममता बॅनर्जी यांचा पुन्हा एकदा अपघात , हेलिकॉप्टरच्या पायऱ्या चढताना पाय निसटून दुखापत ..!!

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमधून जाणार होत्या. या निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या मीडियावर खूप व्हायरल होत आहे.


ममता बॅनर्जी या हॅलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी पायऱ्या चढत होत्या. त्याचवेळी त्यांचा पाय निसटला आणि त्यांचा तोल गेला. त्यामुळे त्या समोरच्या बाजूला पडल्या. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांना तातडीने सावरले. या अपघातात ममता बॅनर्जी यांना किरकोळ जखम झाली आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी वर्धमानहुन एका कार्यक्रमातून परतत असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. गाडीने अचानक ब्रेक मारल्याने ममता बॅनर्जी यांना कपाळावर जखम झाली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी या जखमी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.