माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडून ३३२ रुपये दुसरा हप्ता जाहीर, जिल्ह्यात ऊस दरात घेतली आघाडी…


बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखानेही आज चालू ऊस गळीत हंगामापोटी एफआरपीचा दुसरा हप्ता प्रतिटन ३३२ रुपये जाहीर केला. यामुळे जिल्ह्यात माळेगावने भावाच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. ही रक्कम 20 मार्च अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल व त्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा निधीची तरतूद केल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी वरील धोरणात्मक निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले. कारखाना पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने पणदरे येथे अध्यक्ष केशवराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

गेली तिन्ही हंगामात ऊस गाळप, उपपदार्थ प्रकल्पात विक्रम प्रस्थापित केले त्याबाबत उपस्थित सभासदांनी संचालक मंडळाच्या कार्याचे अभिनंदन केले. सभासदांनी माळेगावने या आगोदर जाहिर केलेल्या एफआरपीच्या पहिला हप्ता प्रतिटन 2800 मध्ये वाढ होण्याची मागणी केली होती.

यानंतर हा हप्ता जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विक्रमी दर देण्याची परंपरा माळेगाव जोपासत असतो, यंदा ही चालू गळीत हंगामात एफआरपी पोटी 3132 आजवर जाहीर झाली आहे. यानंतरच्या कालावधीत खोडके पेमेंट व अंतिम ऊस बिल आदा होणार आहे, असेही अध्यक्ष जगताप यांनी सांगितले आहे.

या दरामुळे विक्रमी भावाची परंपरा यंदाही कायम राहील. यावेळी संचालक योगेश जगताप , नितीन सातव, मदनराव देवकाते, विश्वास देवकाते , तानाजी कोकरे, स्वप्निल जगताप , संजय कोकरे, अभय जगताप, संदीप जगताप आदी उपस्थित होते. आता इतर कारखाने किती दर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!