Crime News : लोणावळ्यामधील दोन दिवसांपासून व्हीलावर बनवत होते पॉर्न व्हिडीओ; पोलिसांनी छापा टाकून टोळीला अटक
Crime News : लोणावळ्यामधील मागील दोन दिवसांपासून व्हीलावर पॉर्न व्हिडीओ बनवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून टोळीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणी आले होते आणि ते पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. यातील काही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले असून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या टोळीतील १५ पैकी १३ जणांना अटक केली आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पॉर्न व्हिडीओवर बंदी घातली आहे. तरीही तरुण-तरुणी पॉर्न व्हिडीओ शूट करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पॉर्न व्हिडीओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे.
दरम्यान, पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.