मोठी बातमी! मराठा आरक्षण संदर्भात शासनस्तरावर मोठ्या हालचाली, महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता..

जालना : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले केल्याने सरकारविरोधात मराठा समाजात नाराजी पसरली आहे. जालन्यात मराठा आंदोलकांचे उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू आहे.

जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस असून अजूनही आरक्षणावर तोडगा निघालेला नाहीअशातच आता शांततेत सुरु असणाऱ्या जालन्यातील लाठीहल्ल्याने हे आंदोलन पेटले आहे.
आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. राज्य धुमसत असतानाच शासन स्तरावर सध्या दोन महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी आहे. मराठा कुणबी जात पडताळणी संदर्भात कामकाज सुरु करण्यात आले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जात पडताळणी प्रमाणपत्राचं शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आरक्षणासाठी विधेयक येण्याची शक्यता आहे.
जर विधेयकाबाबत एकमत झाले तर लगेच विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
