गोव्याच्या नाइट क्लबमध्ये मोठा स्फ़ोट ; 25 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांना आर्थिक मदत जाहीर


गोवा : नॉर्थ गोव्याच्या अरपोरा येथील बर्च बाय रोमियो लेन रेस्टॉरंटमध्ये रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश रेस्टॉरंटचे कर्मचारी आहेत. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गोव्याच्या अरपोरा येथील बर्च बाय रोमियो लेन रेस्टॉरंटमध्ये रात्री लागलेली आग सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये चार पर्यटक आहेत. यात तीन महिला आहेत. नाइट क्लबने अग्नि सुरक्षा नियमांचं पालन केलं नव्हतं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. सिलिंडर स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. “गोव्याच्या अरपोरा येथे आग लागण्याची घटना खूप दु:खद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत” असं पीएम मोदींनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.

       

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करुन परिस्थिती जाणून घेतली. राज्य सरकार पीडित लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहे. पीएम मोदींनी गोव्याच्या अरपोरा येथील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजाराची मदत जाहीर केली आहे.

गोवा पोलिसांनुसार, या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला. यात चार पर्यटक आहेत. 14 स्टाफ मेंबर आहेत. 7 जणांची ओळख अजून पटलेली नाही. 6 लोक जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आग लागण्याचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून तपास सुरु आहे. कायदेशीर कारवाई सुरु आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!