पुणेकरांनो बातमी कामाची!! ३१ डिसेंबरला वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते राहणार पूर्णपणे बंद, जाणून घ्या…


पुणे : पुणे शहरात ३१ डिसेंबरची मोठी तयारी सुरू आहे. पुण्यात दरवर्षी देशभरातून मोठा तरुणवर्ग शिक्षणासाठी येत असतो. त्यामुळे पुण्यात ३१ डिसेंबरच्या रात्री वेगळाच माहोल पाहायला मिळतो. दरम्यान नववर्षात गर्दी लक्षात घेता पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

पुण्यातील लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता गर्दीने फुलून जातो. आज सायंकाळी 5 वाजलेनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ‘मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

पुण्यातील या रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल..

कॅम्प परिसर

बदल : MG रोडवर येणाऱ्या वाहनांना पूर्णपणे बंदी

बदल: इस्कॉन मंदिर चौकाकडून आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहणार

पर्यायी मार्ग : १५ ऑगस्ट चौकातून वाहतूक वळवण्यात येणार

डेक्कन परिसर

बदल : फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार

पर्यायी मार्ग: प्रभात रोड, अलका टॉकीज रोड आणि लॉ कॉलेज रोडकडे वाहतूक वळवण्यात येणार

फर्ग्युसन कॉलेज रोड आणि कॅम्प परिसरातील MG रोड No Vehicle Zone

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!