शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत आज मोठे बदल, कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते?


पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध मिरवणुका निघणार असून शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.आज 6 मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, मिरवणूक पुढे सरकल्यानंतर वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत केली जाणार आहे.

लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीतील एम.जी. रस्ता आणि ईस्ट स्ट्रीट परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिजामाता चौकातून छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता- खंडोजीबाबा चौक–लोकमान्य टिळक चौक-टिळक रस्ता हा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी वाहन चालकांनी आजच्या प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मिरवणुका लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौक परिसरातील वाहतूक संत कबीर चौकातून वळवण्यात येईल. कसबा पेठेतील गणेश रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद असून, ती वाहतूक दारुवाला पूल चौकातून वळवण्यात आली आहे. तसेच, नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील वाहतूक अप्पा बळवंत चौक आणि बुधवार चौकाकडे वळवण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!