जगात हाहाकार, इराण-अमेरिकचं युद्ध आता दुबईच्या वेशीवर; विमानतळाजवळ मोठा हल्ला, धुराचे लोट, तेल टँकरचा स्फोट, विमानसेवा पूर्णपणे ठप्प…


नवी दिल्ली : इराण वि इस्रायल-अमेरिकेच्या युद्धामुळे जगात हाहा:कार माजला असून परिस्थिती झपाट्याने बिघडत आहे. या संघर्षात फक्त तीन देशच होरपळत नाहीयेत, तर आजूबाजूच्या , शेजारील काही देशांवरही हल्ले होत आहेत.

युद्ध सुरू झाल्यापासून दुबईवर देखील अनेक वेळा हल्ले झाले आहेत. आता पुन्हा एकदा दुबईला टार्गेट करण्यात आलं असून सोमवारी सकाळी थेट दुबई एअरपोर्टजवळच ड्रोन कोसळून मोठा हल्ला झाला. त्यावेळी मोठा स्फोटही झाला असून त्याच स्फोटामुळे तिथे असलेल्या इंधनाच्या टाकीला आग लागली.

मात्र अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणून विझवण्यात आली. पण या स्फोटानंतर सुरक्षेच्या कारणास्तव, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही अथवा जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे इराण-अमेरिकचं युद्ध आता दुबईच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचलं असून धोका आणखनीच वाढला आहे.

स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार, रात्रीच्या शांततेत अचानक धमाक्यांचे, स्फोटाचे आवाज ऐकू आले. त्यानंतर काही वेळातच विमानतळाजवळ धूर आणि आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या. दुबई सिव्हिल डिफेन्स आणि इतर आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली.

दुबई मीडिया ऑफिसने X वर दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आग विझवली. या हल्ल्यात कोणतीही दुखापत झाली नाही. भरपूर नुकसान लक्षणीय झाले, जीवितहानी कमी झाल्यामुळे अधिकाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र या ड्रोन हल्ल्यांमुळे दुबईतील नागरिक खूप दहशतीत आहेत.

या हल्ल्यानंतर दुबई नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली आहे. विमानतळावर कोणीही विमानतळाजवळ येऊ नये असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत. तेसच विमानतळ अधिकाऱ्यांनी जनतेला उड्डाणाचे सर्व अपडेट्स ऑनलाइन तपासण्याचे आवाहन केले आहे. या काळात विमानतळाशी संपर्क टाळा, जवळपास येऊ नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!