Breaking news ! जम्मू कश्मीरला बस दरीत कोसळली ,वीस जणांचा बळी शक्यता ..!!

Jammu Kashmir Accident । जम्मू कश्मीरला किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून 250 मीटर खाली घसरली असून या ठिकाणी मोठा अपघात झाला आहे. या अपघातात २० हून अधिक जणांचा बळी जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बचाव कार्य सुरू करण्यासाठी आणि दुर्घटनेचा अंदाज घेण्यासाठी पोलिस आणि बचाव पथकांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. डोडा येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालात मृतांची संख्या २० किंवा त्याहून अधिक असू शकते. (Jammu Kashmir Bus Accident )
पोलिस नियंत्रण कक्ष दोडामधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “किशतवाडहून जम्मूला जाणारी एक प्रवासी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून उलटली आणि दुसऱ्या रस्त्यावर 250 मीटर खाली पडली. “अनेक प्रवाशांचा मृत्यू होण्याची भीती आहे.” या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

