गुन्हे शाखा युनिट ५ पथकाची मोठी कारवाई ; आरोपींकडुन गांजा व तस्कर करण्यासाठी वापरलेली कार हस्तगत, एकुण १४ लाख ८३ हजार ८००रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

लोणी काळभोर : गुन्हे शाखा युनिट ५ पथकाने हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सराईत आरोपींकडुन ३४ किलो ४४० ग्रॅम वजनाचा गांजा व गांजा तस्करी करण्यासाठी वापरलेली कार हस्तगत करून एकुण १४ लाख ८३ हजार ८००रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३१, रा. बिल्डींग नंबर ११ फ्लॅट नंबर १०७, नविन म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर, हडपसर, पुणे) व विशाल दत्तात्रय जाधव, वय २८, रा. वाडकर यांचे रुममध्ये भाडयाने ओढयाचे जवळ, हिंगणे मळा, हडपसर, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
पुणे शहरामध्ये होणाऱ्या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करणेबाबत वरिष्ठ कार्यालयातुन वेळोवेळी सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्या आदेशानुसार १४ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट ५ पथकाचे पोलीस निरीक्षक संदीपान पवार व युनिट ५ तसेच ४ कडील पोलीस स्टाफ असे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गट नंबर ३८०, कृपासिंधु ईस्ट सोसायटीचे समोर सार्वजनिक रोडवर कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, पुणे या ठिकाणी सराईत अक्षय पोपटराव पाडुळे व त्याचा साथिदार विशाल दत्तात्रय जाधव यांना AURA कार क्रमांक MH-12/VT-2000 सह ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन विक्री करण्यासाठी आणलेला ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, गांजाची तस्करी करण्यासाठी वापरलेली AURA कार तसेच एकमेकांना संपर्क करण्यासाठी वापरलेले मोबाईल हॅण्डसेट असा एकुण १४ लाख ८३ हजार ८००रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यांचेविरुध्द व इतर ३ पाहिजे आरोपींविरुध्द लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यांतील आरोपी अक्षय पाडुळे हा साकीनाका पोलीस स्टेशन, मुंबई येथे खुनाचा प्रयत्न गुन्हयामधील आरोपी असुन तो सुमारे १ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देवुन स्वतःची अटक चुकवित होता.सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीपान पवार, गुन्हे शाखा युनिट ५, पुणे शहर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, वैभव मगदुम, पोलीस अंमलदार नासिर देशमुख, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, शशिकांत नाळे, सुभाष आव्हाड, किशोर दुसिंग, वैभव रणपिसे, उमाकांत स्वामी, स्वाती तुपे, अमर चव्हाण, शहाजी काळे, राहुल ढमढेरे अविनाश इंगळे यांचे पथकाने केली आहे.