गजा मारणे तुरूंगाबाहेर येताच बंडू आंदेकर टोळीवर मोठी कारवाई ; पुण्यात नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर करताच आंदेकर टोळीवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारातील व्यावसायिकाकडून दरमहा खंडणी उकळल्याप्रकरणीं दाखल गुन्ह्यात आंदेकर टोळीचा मोरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याचा पुण्यात शिवम याची धुळ्याला रवानगी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
आंदेकर टोळीच्या ‘प्रोटेक्शन मनी’ प्रकरणी गुंड बंडू आंदेकर आणि त्याचा पुतण्या शिवम आंदेकर यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवार, 28 नोव्हेंबरला संपल्यामुळे त्यांना न्यायमूर्ती एस. आर. साळुंखे यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. येथे ‘मकोका’ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश साळुंखे यांनी सुनावणीनंतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आता गुंड बंडू आंदेकर आणि शिवम आंदेकर यांचा मुक्काम पुण्याजवळील धुळे कारागृहात असणार आहे. या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर, आरोपींच्या वतीने अॅड. मिथुन चव्हाण, अॅड. एएस धीवर आणि अॅड. गणेश माने यांनी त्यांची बाजू मांडली.

दरम्यान कुख्यात गुंड गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर करताच पुणे शहरात पुन्हा एकदा या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फिर्यादी देवेंद्र जोग यांनी न्यायालयात हजर राहून कुणीही चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. विशेष न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात-मूचलक्यावर जामीन मंजूर केला. जेलमधून जामिनावर सुटका होताच गजानन मारणे थेट पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाला आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त यांच्या समोर हजेरी लावली. त्यानंतर आता आंदेकर टोळीवर कारवाई करण्यात आली.

