तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर मोठी कारवाई; तब्बल 316 अधिकाऱ्यांचे निलंबन, कारवाईंचा धडाका…

पुणे : राज्याच्या प्रशासनातील धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात प्रधान सचिव म्हणून रुजू झाल्यापासून सुरू केलेल्या कामांचा धडाका सुरूच आहे. त्यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांना लेखी आदेश देत दिव्यांग प्रमाणपत्रांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर आता मोठी कारवाई करत 316 दिव्यांग बोगस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

राज्यातील 28 जिल्हा परिषदांमध्ये 10,922 दिव्यांग अधिकारी असून त्यापैकी 6,218 अधिकाऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. यातील 316 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सरकारने मोठी कारवाई केली आहे.दिव्यांग नसतानाही राज्यातील दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. या कारवाईमुळे बोगस दिव्यांग अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.शिक्षण, आरोग्य, बांधकाम विभागासह सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या पडताळणीत समावेश आहे.

यापूर्वी 18 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचा आदेश पाठवण्यात आले आहेत. जिल्हा परिषद पातळीवर या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.