मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी दुर्घटना, केमिकल टँकरचा भडका होऊन ३ जणांचा मृत्यू…

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लोणावळ्याजवळ ओव्हर ब्रीजवर केमिकल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
यामुळे ब्रीजखाली देखील अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. ही आग लागल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळवली जात आहे.
यामुळे मोठी गर्दी झाली होती. सध्या बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केमिकलची वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन मोठा अपघात झाला तोच टँकरने पेट घेतला.
या अपघातामुळे टँकरमधील केमिकल रस्त्यावर सांडले आणि मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच यामुळे एक गाडी रस्त्यावर घसरली. यामध्ये दुचाकीवरील १२ वर्षांचा मुलगा होरपळून ठार झाला तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातामध्ये आतापर्यंत एकूण ३ ठार आणि ३ गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे