उरुळी कांचनमध्ये मोठा अपघात! पिकअपच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, ४ गंभीर जखमी…


उरुळी कांचन : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत बसलेल्या सहा जणांना एका भरधाव पिकअप चालकाने जोरदार धडक दिली.

या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी (ता.०२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकात झाला.

मेहबूब रहमान मियाडे (वय.६७, रा. माकर वस्ती सहजपुर ता. दौंड), अशोक भीमराव (वय.२५, रा. बसनाळ सावली बिदर कर्नाटक) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर या अपघातात भारती लक्ष्मण बापूराव रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली), मैनुद्दीन लालमिया तांबोळी (वय.६७, रा. आंबा पिंपळगाव, लातूर), वैशाली भागवत बनसोडे (वय.४०,रा. सोरतापवाडी ता. हवेली, पुणे), भागवत बनसोडे वय.४५, हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

सविस्तर माहिती अशी की, सोलापूरच्या दिशेने जाण्यासाठी सहा जण तळवडी चौकात वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे होते. याच दरम्यान सोलापूर च्या दिशेने एक पिकअप वाहन निघाले होते. यावेळी चौकात उभे राहिलेल्या चौघांना पिकअप चालकाने जोरदार धडक दिली.

धडकेचा जोर इतका होता की एकाचा जागीच मृत्यू झाला तर तर उर्वरित पाच जणांना गंभीर दुखापत झाली. जखमींना लाईफ केयर रुग्णवाहिकेतून सिद्धिविनायक हॉस्पिटल हा ठिकानी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. या अपघातात पिकअप चालक हा सोलापूरच्या बाजूने न थांबता पळून गेला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अक्षय बंटी कांचन ओंकार रानवडे, तुषार पांगारे, प्रथमेश जगताप, आर्यन जगताप आदींनी तातडीने घटनास्थळी पोहोचले व तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!