पुण्यात मोठी दुर्घटना! एमआयडीसीची भिंत कोसळली, 35 वर्षीय कामगाराचा मृत्यू

पुणे : पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील शेड आणि भिंत कोसळून,काल संध्याकाळच्या सुमारास ३५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे.मारुती भालेराव असं मृत पावलेल्या कामगाराचं नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी परिसरातील ‘जे’ ब्लॉक येथील प्लॉट नंबर ४८५ या ठिकाणी ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत मारुती भालेवार (३५ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरु केले आहे.

या ठिकाणी एका खाजगी कंपनीचा बांधकाम करण्यासाठी जे सी बी मशीनने खोदकाम सुरू होतं. हे खोदकाम करत असताना बाजूला असलेल्या ‘एम एस मेटल वर्क’ या कंपनीचं जुना शेड आणि भिंत कामगाराच्या अंगावर पडल्याने कामगारांचा मृत्यू झाला.

या घटनेसंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य तातडीने सुरु करून मारुती भालेराव यांचा मृतदेह मातीच्या ढिगाऱ्या खालून काढला आहे. या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
‘जे’ ब्लॉक येथील प्लॉट क्रमांक ४८५ चा मालक एमआयडीसी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची रीत सर परवानगी घेऊन खोदकाम करत होता का ? हे अजून स्पष्ट झालेल नाही. आता या प्रकरणात मालक आणि त्या ठिकाणी काम करणारा ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
