कल्याणमध्ये मोठी दुर्घटना! १७ व्या मजल्यावरून क्रेन मजूरांच्या अंगावर कोसळून जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी


मुंबई :कल्याणमधील एका इमारतीच्या बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. सतराव्या मजल्यावर काम सुरू असताना क्रेन अचानक कोसळून दोन मजुरांच्या अंगावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कल्याणमधील विकास डेव्हलपर्सच्या ‘रिट्स’ इमारतीच्या सतराव्या मजल्यावर क्रेनच्या सहाय्याने बांधकाम साहित्य चढवले जात असताना अचानक तोल जाऊन क्रेन मजुरांच्या अंगावर कोसळली. या अपघातात अमा हुल्ला (22 वर्षे) या तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर कौसर अलाम (23 वर्षे) हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असुन मृत मजुराचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मृत मजुराच्या नातेवाईकांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

       

उंच इमारतींवरील काम करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन होते का?, याबाबत प्रशासन आणि कामगार विभागाकडून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. सध्या पोलिसांकडून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!