पुण्यात होळी सणाला मोठी दुर्घटना! लाईटचा गर्डर अचानक पडला अन् 16 जण गंभीर जखमी…

पुणे : राज्यभरासह संपूर्ण देशभरात होळी आणि धुलीवंदनाचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे.अशातच आता पुण्यात होळी सणाला मोठा गालबोट लागला आहे. होळीच्या सेलिब्रेशनमध्ये कार्यक्रमात नाचत असताना अचानक लाइटचा गर्डर पडला. या घटनेत 15 ते 16 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,पुण्यातील कोरेगाव पार्क – मुंढवा रोडवरील रॉयल फॉर्ममध्ये होळीचा उत्साह सुरू असतानाच अचानक लाईटचा गर्डर पडल्याने तब्बल 16 जण जखमी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. होळीचा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी हजेरी लावली होती. सर्वजण डीजेच्या तालावर नाचत होते. त्याचवेळी अचानक लाईटचा गर्डर नाचत असलेल्या तरुणांच्या अंगावर पडला. या घटनेमध्ये 16 जण जखमी झाले तर 4 जणांना उपचारासाठी ससूनला हलवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लाईटचा गर्डर कसा पडला यामागचे कारण समोर आले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
